शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शासनाने शाश्वत शेती विकासाचे धोरण राबवले - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:54 PM

अकोला: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, शेतकरी, शेतीच्या शाश्वत विकासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी केले.

अकोला: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, शेतकरी, शेतीच्या शाश्वत विकासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी केले.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, प्रकल्प संचालक, आत्मा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या क्रीडागंणावर आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, २७ डिसेंबर रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्टÑ कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. तसेच आमदार गोपीकिशन बाजोरिया,आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जैनुद्दीन जव्हेरी, गणेश कंडारकर, कृषी विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे यांची उपस्थिती होती.शासनाने विविध योजनेसह शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन अमलात आणला. विविध योजनांचे पैसे शेतकºयांच्या खात्यात आता जमा होत आहेत. शेतकरी सक्षमपणे उभा राहावा, यासाठीचे हे निर्णय असून, आता गावागावात जाऊन विद्यार्थी, शेतकºयांना कौशल्य विकासासंदर्भात मार्गदर्शन, प्रशिक्षण देणार आहोत यासाठी ३०० कोटी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या शाश्वत शेती विकास योजनांची माहिती देताना त्यांनी ज्यांचा थेट शेतकºयांशी संबंध येतो असे सरपंच, अंगणवाडी सेविका, पटवारी, ग्रामसेवकांना कृषी विद्यापीठाने कृषी प्रदर्शनाचे निमंत्रण दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली.खा. धोत्रे शेतकरी विश्वाचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगताना, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून योजना तयार करण्याची गरज आहे. सध्या त्यादृष्टीने काम सुरू आहे, शेतकºयांनी प्रगत,आधुनिक तंत्रज्ञान बघून त्याचा शेतीत वापर करावा, या उद्देशाने कृषी प्रदर्शन भरविण्यात येते. प्रदर्शनातील तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी किमान एका-एका गावातून २५ शेतकरी यावे, ही अपेक्षा आहे. म्हणूनच ज्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले, तो उद्देश सफल होण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठाचा शेतकºयांशी जिव्हाळा असून, चालत नाही तर प्रत्यक्षात काम किती झाले हे महत्त्वाचे असल्याची कानटोचणी खासदार धोत्रे यांनी उद्घाटन कार्यक्रमात केली. डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधन, तंत्रज्ञानाचा आढावा अध्यक्षीय भाषणातून घेतला. डॉ. मानकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. प्रदीप बोरकर यांनी तर आभार राजेंद्र निकम यांनी मानले. दरम्यान, दरम्यान, प्रदर्शनात कृषी संशोधन व बचत गटांची दालने असून, अनेक दालने यावर्षी रिकामी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलagricultureशेती