शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

शासकीय मूग खरेदी केंद्र उघडलेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:47 PM

तारीखच निश्चित झाली नसल्याने शेतकऱ्यांना २,४०० रुपये कमी दराने बाजारात मूग विकण्याची वेळ आली आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: मुगाचे हमीदर यावर्षी प्रतिक्विंटल ७५ तर उडिदाचे दर १०० रुपयांनी वाढविण्यात आले; परंतु शासकीय खरेदी केंद्र अद्याप उघडण्यात आले नाही. शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी नोंदणी करण्याची तयारी करण्यात आली; पण प्रत्यक्षात खरेदी केव्हा होईल, याची तारीखच निश्चित झाली नसल्याने शेतकऱ्यांना २,४०० रुपये कमी दराने बाजारात मूग विकण्याची वेळ आली आहे.गतवर्षी मुगाला प्रतिक्विंटल ६,९७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आले होते. यावर्षी हे दर ७ हजार ५० रुपये करण्यात आले आहेत. उडिदाचे हमीदर गतवर्षी ५,६०० रुपये होते. ते यावर्षी ५,७०० रुपये आहेत. मुगाच्या दरात ७५ तर उडिदाच्या हमीदरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली. असे असले तरी आजमितीस मुगाला बाजारात प्रतिक्विंटल ३,७०० ते सरासरी ४,६५० रुपयेच दर आहेत. या हमीपेक्षा हे दर २,४०० रुपयांनी कमी आहेत. उडिदाचे दरही प्रतिक्विंटल ४,००० ते सरासरी ४ हजार ९०० रुपये आहेत. हे दरही बाजारात ८०० रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे, तेव्हाच वाढलेल्या हमीदराचा शेतकऱ्यांना लाभ होईल; परंतु मागील काही वर्षांचा अनुभव बघता, शासकीय खरेदी केंद्र अद्याप तरी सुरू झाले नसल्याने आजमितीस बाजारात जे दर आहेत, त्याच दराने शेतकºयांना मूग व उडीद विकावा लागत आहे.दरम्यान, जून महिन्यात वेळेवर पाऊस आल्यास या पिकांची पेरणी केली जाते. तथापि, पावसाच्या अनिश्चिततेमुळे मागील काही वर्षांपासून मूग व उडीद पिकाची पेरणी कमी झाली. उत्पादनही घटले आहे. यावर्षीही वेळेवर पाऊस न आल्याने मुगाचे क्षेत्र घटले असून, त्याजागी शेतकºयांनी कपाशी, सोयाबीन पेरणी केली. नवीन मुगाची आवक बाजारात दरवर्षी १५ आॅगस्टपर्यंत सुरू होते; परंतु यावर्षी उशिरा बाजारात मूग विक्रीसाठी आला. दरम्यान, शुक्रवारी अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २७८ क्ंिवटल आवक होती. उडिदाची केवळ ३२ क्ंिंवटल आवक होती.- नोंदणीचे पोर्टल बंदशासनाने मूग खरेदीसाठीची नोंदणी करण्याचा आदेश शुक्रवारी संबंधित यंत्रणेला दिला आहे. तथापि, पोर्टलच बंद पडले. असे असले तरी प्रत्यक्षात खरेदी केव्हा सुरू होईल, याची तारीखच निश्चित नाही.

 बाजारात सध्या मुगाची आवक सुरू असून, जास्तीत जास्त दर प्रतिक्ंिवटल ५,४०० रुपये आहेत. शासकीय खरेदी केंद्राची नोंदणी करण्यात शुक्रवारी सुरुवात करण्यात आली; पण खरेदी केव्हा करतील, हे सांगता येत नाही.- शिरीष धोत्रे,सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती