अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.अकोला दौऱ्यावर आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली; परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा पुरेसा लाभ शेतकºयांना मिळाला नसून, तोकडी मदत दिली जात आहे, असे सांगत सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या नाही, असा आरोप पाटील यांनी केला. वाढत्या महागाईत सामान्य माणूस अडकला असून, बेरोजगारीत बेसुमार वाढ झाल्याने, सरकारप्रती समाजात अस्वस्थता आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डॉ. संतोष कोरपे, डॉ. आशा मिरगे उपस्थित होत्या.सरकारने आश्वासने पूर्ण केली नाही!राज्यात वेगवेगळ्या समाजाला सरकारने दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम सरकारने हाती घेतला; मात्र या कार्यक्रमातर्गंत बेसुमार कामे झाल्याने, त्याचा उपयोग झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.सर्वच प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार!‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’ अशा घोषणा सरकारकडून करण्यात आल्या; मात्र राज्यात कोणतीही गुंतवणूक झाली नाही. यासह राज्यातील सर्वच प्रश्नांवर विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठविणार असल्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला.अधिवेशन गुडाळण्याचा सरकारचा डाव!राज्य विधिमंडळाचे दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशन एक आठवड्याने वाढविण्याची मागणी आम्ही सरकारकडे कली; मात्र अधिवेशन वाढविण्याची सरकारची भूमिका नसल्याने, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप पाटील यांनी केला.