अकोला: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कर्मचारी बेमुदत संपावर असताना शासनातर्फे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण अवलंबवून आंदोलन दडपण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु जोपर्यंत शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम असल्याचे कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे सांगण्यात आले. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील १२ हजार कर्मचारी सामूहिक रजेवर आहेत. शनिवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली; कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले असून, ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण लागू असल्याची आठवणदेखील शासनाने एका पत्राद्वारे शासनाने करून दिली; मात्र ठोस आश्वासन मिळत नाही, तोर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे घेण्यात आला.
शासनाकडून कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्याची तयारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 3:47 PM
Akola Agriculture University employees शासनातर्फे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण अवलंबवून आंदोलन दडपण्याची तयारी सुरू केली आहे.
ठळक मुद्दे ‘काम नाही, वेतन नाही’ धोरण लागूकर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनावर ठाम