देशातील लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्यामुळे लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे. जनतेच्या आरोग्याची जबाबदारी घेत केंद्र सरकारने १८ ते ४४ या वयाेगटांतील नागरिकांना माेफत लस देण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने राज्यांना लस खरेदीची मुभा दिल्यानंतर महाराष्ट्रासाठी एकरकमी धनादेश देऊन १२ कोटी लसींची मात्रा विकत घेण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. आता लस पुरवठ्याची जबाबदारी केंद्र सरकारने उचलल्याने राज्य शासनाने सात हजार कोटींचा निधी गरजूंसाठी वितरित करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री धाेत्रे यांनी केली आहे. शासनाने लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करून केंद्राच्या मोहिमेस सहकार्य करुन जनतेच्या जीवित रक्षणास प्राधान्य द्यावे, असे धाेत्रे यांनी नमूद केले आहे.
शासनाने गरजूंसाठी सात हजार काेटींचे नियाेजन करावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:23 AM