शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

शासनानेच खरेदी करावा मूग; बाजार समित्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:49 AM

शासनानेच मूग खरेदीचे शासकीय केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समित्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

ठळक मुद्दे आधार किमतीपेक्षा कमी किमतीने व्यवहार होत असेल, तर त्यास प्रतिबंध घालण्याचा अधिकार बाजार समित्यांना आहे. समित्यांनी आता जिल्हाधिकाºयांमार्फत थेट शासनाकडेच शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.

 - राजेश शेगोकार,अकोला : सरकार शेतमालाची हमीभावाने खरेदी होण्यासाठी आग्रही असून, त्यासाठी व्यापाºयांवर कारवाई करण्यापर्यंतचे पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत आहे. अशा स्थितीत बाजारपेठेतील शेतमालाच्या भावाची स्थिती पाहिली म्हणजे ‘हमीभाव’ हे मृगजळ ठरते की काय, अशी स्थिती आहे. सद्यस्थितीत बाजारात मुगाची आवक सुरू झाली असून, मुगाचे हमी दर प्रतिक्विंटल ६ हजार ९७५ रुपये जाहीर करण्यात आले असले, तरी त्या तुलनेत सध्या बाजारात ३ हजार ६०० ते ३ हजार ७०० रुपये दराने मुगाची खरेदी करण्यात येत आहे. हमी दराच्या तुलनेत बाजारात मुगाला कमी भाव मिळत असल्याने, मूग उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, आता शासनानेच मूग खरेदीचे शासकीय केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समित्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.शासनाने ठरवून दिलेल्या आधार किमतीपेक्षा कमी किमतीने व्यवहार होत असेल, तर त्यास प्रतिबंध घालण्याचा अधिकार बाजार समित्यांना आहे. त्या अधिकारानुसारच बाजार समित्यांनी अशा खरेदीस प्रतिबंध करण्याची तरतूद आहे. त्याच अधिकाराचा आधार घेत समित्यांनी आता जिल्हाधिकाºयांमार्फत थेट शासनाकडेच शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. मुगाचा पेरा व शेतमालाची आवक व प्रत्यक्षात मिळणारा भाव लक्षात घेता येत्या खरीप हंगामात तयार झालेला मूग कमी दराने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शासनाने मूग खरेदीचे केंद्र सुरू केले, तर शेतकºयांचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. अकोल्यासह पश्चिम वºहाडातील सर्व बाजार समित्यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन याबाबत सूचित केले आहे. शासनाने खरेदी केंद्र सुरू केले, तरच शेतकºयांना मुगाचा भाव मिळू शकतो, अन्यथा उत्पादन खर्चही भरून निघू शकेल एवढा भाव मिळणे कठीण आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती