शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

  सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 2:39 PM

जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.

मूर्तिजापूर: शेतकरी हिताची एकही गोष्ट या शासनाने केली नसून, सरकारच शेतकरी आत्महत्येस जबाबदार आहे. खऱ्या अर्थाने सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, हमी भाव दिला तरी या देशातला शेतकरी सुखी होईल, शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय झाला पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ७ जानेवारी रोजी मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकºयांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.भाजपा सरकारकारचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, मोदींना रात्रीचा नाद आहे. ते कुठली घोषणा रात्रीच करतात. ती नोटबंदी असो की जीएसटी, फुलतांब्याचा निर्णय असो. भाजपाला लेकरं नवसाने झाले असल्याची टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या भाषणाची एक झलक उपस्थित शेतकºयांना ऐकवली. राम मंदिर नाही बांधले तर इथला शेतकरी मरणार नाही; पण शेतकºयांप्रती उदासीन धोरणाचा निषेध करीत सरकारने शेतकºयांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जाऊ नये, असा सज्जड दमही भरला. आमची आंदोलने गांधीजींच्या मार्गाने चालू आहेत. जर भगतसिंगाच्या रूपात आलो तर शासनाला पळता भुई थोडी होईल, असा इशाराही शासनाला दिला. शेतकºयांच्या प्रश्नावर शेतकºयांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. विचारवंत डॉ. श्रीकांत तिडके यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शेकापचे विजय गावंडे, प्रगती शेतकरी मंचाचे राजू वानखडे, भारतीय किसान संघाचे राहुल राठी, श्रावण रणबावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचे संयोजक अरुण बोंडे यांच्यासह न्यू यंग क्लब फार्मर्स, प्रगती शेतकरी मंच, भारतीय किसान संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनमंच या सर्व संघटना धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना