लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांंपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, जिल्हय़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या लढती बुधवारी दुपारनंतरच निश्चित होणार आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांंच्या छाननी प्रक्रियेत वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांंपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांच्या निवडणूक रिंगणात कोण-कोण उतरणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमधील उमेदवारांच्या लढतीचे चित्र २७ सप्टेंबर रोजीच दुपारनंतर निश्चित होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक लढविणार्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप बुधवारी ३ वाजतानंतर संबंधित तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे.
ग्रा.पं. निवडणुकांच्या लढती आज होणार निश्चित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:45 AM
अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांंपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, जिल्हय़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या लढती बुधवारी दुपारनंतरच निश्चित होणार आहेत.
ठळक मुद्देउमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस