अकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या मागणीनुसार शासनाने कृषी विभागाचे कर्मचारी दिले असून ,हे कर्मचारी कापसाची ग्रेडिंग करणार आहेत.त्यामुळे कापूस खरेदी वाढेल असा विश्वास पणन महासंघाला आहे .1972 पासून राज्यात अधिकार कापूस खरेदी योजना राबवण्यात येत होती .त्यामुळे राज्य 400 ते 450 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत होती .शेतकऱ्यांच्या करता शासनाने ही योजना 2001 पर्यंत राबविली.मात्र 2002 -2003 पासून भारतीय कापूस महामंडळ ,सहकारी सूत गिरण्या आणि व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची परवानगी देण्यात आली .त्यानंतर राज्य शासनाने कापूस एकाधिकार योजनेवर आर्थिक भार पडू नये म्हणून पणन महासंघाच्या कर्मचाºयांना २००४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगितले .तसेच दरवर्षी दरवर्षी पणन महासंघाचा वयोमानानुसार कमी होणारा कर्मचारीवर्ग कमी होत गेला त्यामुळे महासंघाकडे मनुष्यबळाची अत्यंत कमतरता आहे आजमितीस पणन महासंघाकडे 141 कर्मचारी असून त्यात ग्रेडरची संख्या ही 67 आहे2019 -20 पासून भारतीय कापूस महामंडळाचा उप अभिकर्ता म्हणून पणन महासंघ राज्यात कापूस खरेदी करत असून जवळपास 74 टक्के खरेदी केंद्र केली आहे तसेच 121 जिनिंग प्रेसिंग मधून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत यावर्षी पणन महासंघाने जवळपास 57 क्विंटल कापूस खरेदी केला आहे परंतु कर्मचाºयांची कमतरता भासत असल्याने पणन महासंघाकडे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत .राज्यातील शेतकºयांकडे ३५ ते ४० टक्के कापूस पडून आहे. खासगी बाजारात कापसाचे दर ४ हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत त्यामुळे शेतकरÞयांचा कल पणन महासंघाकडे आहे.परंतु पणन महासंघाकडे मनुष्यबाळाची कमतरता आहे.तसेच कापूस खरेदी केंद्र वाढविण्यासाठी पणन महासंघावर दबाव वाढत आहे. या पृष्ठ भूमीवर पणनमहासंघाने कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून कृषी विभागाचे कर्मचारी पणन महासंघाला देण्यात यावी अशी मागणी केली होती .याला अनुसरून कृषिमंत्र्यांनी पणन महासंघाला कर्मचारी दिले असून ,या कर्मचाºयांना पणन महासंघाच्या वतीने कापूस ग्रेडिंगच प्रशिक्षण देण्यात येत आहेपणन महासंघाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे.दुसरीकडे कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी होत आहे म्हणूनच कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून कृषी विभागाचे कर्मचारी देण्याची मागणी केली होती .पूर्ण झाली असून लवकरच विभागाचे कर्मचारी काम सुरू करणार आहेत.-अनंतराव देशमुख ,अध्यक्ष ,पणन महासंघ ,मुंबई .
'पणन' च्या कापूस खरेदी केंद्रावर कृषी विभागाचे ग्रेडर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 4:42 PM