अकोट फैल, संत कबीर नगर, लाडीस फैल, भीम चौक परिसरातील अनेक गरजू कुटुंबांना किराणा व धान्य वितरित करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रारंभ करण्यात आला. या वितरण सोहळ्यात उपमहापौर व उत्तर मंडळ अध्यक्ष राजेंद्र गिरी, युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष उमेश गुजर,नगरसेविका अनिता राजेश चौधरी, उत्तर मंडळ सरचिटणीस रमेश करिहार ,युवा मोर्चा महानगर सरचिटणीस उज्ज्वल बामनेट,राजू चौधरी, दांडगे काका, युवा मोर्चा उत्तर मंडळ उपाध्यक्ष बल्लू चौधरी, आदीं उपस्थित होते.
फाेटाे...
..................................
खंडेलवाल मराठी शाळेत प्रथमदिनोत्सव
अकोला : येथील खंडेलवाल मराठी प्रा. शाळा व सरस्वती शिशु मंदिरात २८ जून रोजी ‘प्रथमदिनोत्सव सोहळा’ उत्साहात साजरा झाला. ऑनलाईन शाळेचे उदघाटन मराठी व सरस्वती शिशु मंदिराच्या पर्यवेक्षिका मंजूषा अलकरी तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत कोविड नियमाचे पालन करून वर्ग ४ थी च्या ५ ते ६ विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत सोडून व श्रीफळ फोडून झाले.यावेळी मुख्याध्यापक सुनील कराळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. प्रास्ताविक कराळे यांनी केले
.......................
खोटे प्रतिज्ञापत्र कारवाईची मागणी
अकोला : मनपामध्ये गत पंधरा वर्षांपासून मानधन तत्त्वावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये शंभर रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर लेखी स्वरूपात शर्ती व अटी सह करारनामा केला जातो. परंतु या करारनाम्याचे सर्रास उल्लंघन होत असून विधी विभागामार्फत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने यासंदर्भात चौकशी करून उचित कारवाई करण्याची मागणी मनपाच्या मानधन सेवेतून मुक्त झालेले अब्दुल रशीद,संजय खंडारे,नरेश बोरकर,विष्णू डोंगरे,अनिकेत गीते आदींनी केली आहे.
....................
मनुताई शाळेत ऑनलाईन पालक सभा
अकोला : स्थानिक मनुताई कन्या शाळेत नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला पालक सभा संपन्न झाली.काेविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक सभा ऑनलाईन झाली. शिक्षिका देशमुख अग्निहोत्री यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका धारस्कर यांनी पालकांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. पालकांतर्फे विनोद वानखडे यांनी आपले विचार मांडले .पालकांच्या समस्येचे निराकरण शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मलिये यांनी केली. संचलन मुळे तर आभार प्रदर्शन पानझाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पाचडे व जोशी यांनी प्रयत्न केले.
..............
ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाला अनिसचा विरोध
अकोला - ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही असे कथित ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमात समाविष्ट करून केंद्र सरकार भावी पिढ्यांना दैववादी बनवत असून याविरुद्ध लवकरच आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हा संघटक पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी दिला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ज्योतिषशास्त्र शिकविण्यात येणार आहे. यावर्षीपासून हे विद्यापीठ पदव्युत्तर पदवी आणि पदविका देणार आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली चार दशकांपासून ‘फल ज्योतिष थोतांड आहे’ हे लोकांना समजावून सांगत आहे. जेव्हा २००१ साली विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला होता, तेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने,तिन महिने फल ज्योतिष विरोधी अभियान राबविला होता.त्यानंतर हा अभ्यासक्रम रद्द केला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राबविलेल्या अभियानात ज्योतिष्यांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्यासाठी पाचारण केले होते. परंतु कोणीही फल ज्योतिष हे शास्त्र आहे असं सांगू शकले नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करुन लोकांना दैववादी बनविण्याचे षडयंत्र सुरू आहे.हे षडयंत्र उलथविण्याचा प्रयत्न करुन लोकांचे प्रबोधन करण्यात येईल असेही अनिसने काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे. अनिसचे शहर संघटक चंद्रकांत झटाले, संध्या देशमुख, ॲड. अनिल लव्हाळे, आशु उगवेकर, दिगंबर सांगळे, धम्मदीप इंगळे, मंगेश वानखडे, ॲड.शेषराव गव्हाळे, भारत इंगोले, विजय बुरकुले, प्रेमदास राठोड, अमोल ठाकरे, संजय उमक, ॲड. रुपाली राऊत, ॲड. देवानंद फुसे, भास्कर काळे, विठ्ठल तायडे, मनोहर इंगळे, ॲड. रवी शर्मा, घनश्याम दाते, कौशिक पाठक, योगिता वानखडे, रिया उगवेकर हे पदाधिकारी तूर्त निषेधांची आणि जागृतीची ऑनलाईन मोहीम सुरू करणार आहेत.