अकोला: जिल्ह्यातील एपील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी भारतीय खाद्य निगमच्या वाशिम येथील गोदामातून धान्याची उचल सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात लवकरच केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही योजनेत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या राज्यातील एपील केशरी शिधापत्रिकाधारकांना ८ रुपये प्रती किलो दाराने गहू व १२ रुपये प्रती किलो दराने तांदळाचे वितरण करण्यासाठी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यातील धान्यसाठा शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एपील केशरी शिधापत्रिकाधारक ३ लाख १५ हजार लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कायार्लयामार्फत भारतीय खाद्य निगमच्या वाशिम येथील गोदामातून गहू व तांदूळ इत्यादी धान्याची उचल सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना लवकरच रास्तभाव धान्य दुकानांमधून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी भारतीय खाद्य निगमच्या वाशिम येथील गोदामातून धान्याची उचल करण्यात येत आहे. मागणीनुसार धान्यसाठा उपलब्ध झाल्यानंतर पुढील आठवड्यापासून केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी