सतत चार वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहेत. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिके हातची निघून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात प्रथम मूग, उडीद पिकावर अज्ञात विषाणूने आक्रमण केल्याने काहीच हाती आले नाही. त्यानंतर परतीच्या पावसाने सोयाबीनची नासाडी केली. शेतकऱ्यांचे भरवशाचे पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादन घटले. यामध्ये शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यानंतर मोठ्या हिमतीने पैशांची उसनवारी करून रब्बी हंगामात पेरणी केली. सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हरभरा व गहू पिकांची पेरणीही वाढली. मात्र गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे हरभऱ्याचे पीक धोक्यात सापडले आहे.
(फोटो)
हरभऱ्याची फूलगळती सुरू!
ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची फूलगळती वाढली आहे. फूलगळती रोखण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असून, उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.