मूर्तिजापूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीची पोट निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 4:59 PM
Gram Panchayat By Election : ५० ग्रामपंचायत मधिल १२० जागांसाठी ९७ प्रभागातील निवडणूक २१ डिसेंबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे.
-संजय उमक मूर्तिजापूर : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत पोट निवडणूकी दरम्यान सर्वाधिक मूर्तिजापूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायत मधिल १२० जागांसाठी ९७ प्रभागातील निवडणूक २१ डिसेंबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे. शुक्रवार पर्यंत केवळ १० नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. तालुक्यात विरवाडा, मुंगशी, घुंगशी, सांगवामेळ, शेलू नजीक, दातवी, दताळा, जाभा खुर्द, रेपाडखेड, समशेरपूर, गाजीपुर, खापरवाडा, दापुरा, कोळसरा, लोणसणा, ऐंडली, हिवरा कोरडे, खोडद, राजूरा सरोदे, आकोली जहागीर, बोरगाव निंघोट, वाईमाना, रंभापूर, नागोली, खरब नवले, सांजापूर, जितापूर खेडकर, टिपटाळा, ब्रम्ही खुर्द, बोर्टा, लंघापूर, माना, पोही, सोनाळा, दहातोंडा, मुरंबा, शिवण खुर्द, बिडगाव, मंडूरा रामटेक, नवसाळ, मधापूरी, वडगाव, राजनापूर खिनखिनी, सोनोरी मूर्तिजापूर, शेरवाडी, धानोरा वैद्य, आरखेड, कानडी, कव्हळा या ५० ग्रामपंचायत मधिल पोट निवडणूक २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे, ३० नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. ६ डिसेंबर ही नामांकन भरण्याची शेवटी तारीख आहे. तर ७ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असली तरी ३ डिसेंबर पर्यंत केवळ विरवाडा २, सांगवामेळ २, दताळा १, गाजीपुर १, जितापूर खेडकर १, टिपटाळा १, वाईमाना १, नागोली १, येथून १० नामांकन दाखल झाले आहेत, सोमवार नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने सोमवारी इतर ग्रामपंचायत साठी अर्ज दाखल होणार आहे. ९ तारखेला उमेदवारी मागे घेता येईल. तथापि पोटनिवडणूक असल्याने व यातील ४७ ग्रामपंचायतीचा कालावधी डिसेंबर २०२२ मध्ये संपणार असल्याने नागरिकांना या निवडणुकीत स्वारस्य नसल्याचे दिसून येते. यावर्षी ५१ ग्रामपंचायत पैकी जानेवारी महिन्यात २९ ग्रामपंचायतच्या सार्वत्र निवडणूक पार पडली. या ५० ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तहसीलदार प्रदीप पवार हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.