अकोला: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठतेनुसार दहा टक्के कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेत पदभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत लवकरच पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार दहा टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गात समाविष्ट करण्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यास शासनाच्या ग्रा विकास विभागाने १८ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठतेनुसार दहा टक्के कर्मचाऱ्यांची त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा परिषदेअंतर्गत रिक्त विविध संवर्गातील पदांवर नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनामार्फत विभागामार्फत पदभरतीची प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.