नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत, कुरूम, २५ वर्षे
विकासाच्या नावावर विजयी मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. २०१५ मध्ये विवाह करून नांदखेडच्या घोगरे परिवारांची सून झाल्यावर पती सोबत संसार न करता समाज सेवा सुरू केली. गाव नांदखेड असताना गट ग्रामपंचायत असलेल्या टाकळी खुरेशी गावातील प्रभागातून दोघांनी नांमाकन दाखल केले. मात्र, मतदारांना मला विजयी केले तर पती अल्प मताने पराभूत झाले असले तरी आम्ही दोघेही विजयी समजूनच समाजाचा विकास समजून गावाचा विकास करू.
-सौ. सरिता विपुल घोगरे, नांदखेड
जऊळका ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी गावाच्या विकासाच्या उद्देशाने ग्रामपंचायत तरुण मंडळींच्या हाती दिली आहे. युवापिढी कसे काम करू शकते, यांचे माॅडेल गाव करण्याचा संकल्प आहे. गावातील सर्व रखडलेली कामे आम्ही त्वरित पूर्ण करू. गावाचे नंदनवन करून दाखविणार.
-दीपक शेटे नवनिर्वाचित सदस्य जऊळका ग्रा.पं.
मोहाळा येथे माझ्यासारख्या सामान्य महिलेला हिदायत पटेल गटाने उमेदवारी दिली. मतदारांनी निवडून दिले. त्यामुळे सरपंच म्हणून मी गावातील विकास कामे करील. रस्ता, पाणी, घरकुल कामावा प्राधान्य देईल.
-वंदनाबाई पळसपगार
नवनिर्वाचित सदस्य, मोहाळा ग्रा.पं.