शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

राज्यभरातील  ग्रामसेवक १ जानेवारीपासून सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:12 PM

अकोला : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप येत्या १ जानेवारीपासून सोडणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी पाठविले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांकडून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी रात्री-अपरात्री केव्हाही धमकीवजा आदेश देतात. ऐनवेळी कामाच्या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.

अकोला : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप येत्या १ जानेवारीपासून सोडणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी पाठविले.जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांकडून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी रात्री-अपरात्री केव्हाही धमकीवजा आदेश देतात. तत्काळ कामांसाठी आदेश सोडतात, त्यामुळे कायदे, नियम मोडीत काढले जात आहेत. ऐनवेळी कामाच्या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. हृदयरोग, रक्तदाबाच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवकांना आधीच अतिरिक्त कामांचा ताण आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय युनियनने घेतला आहे. त्याचवेळी इतर अधिकृत संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचेही ठरले. त्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी प्रधान सचिवांसह सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविले आहे.- सरकारी कामांसाठी स्मार्ट फोनचा वापर नाही!सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडण्यासोबतच शासनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वत:च्या स्मार्ट फोनवर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड न करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामध्ये एसबीएम फोटो अपलोड करणे, पीक कापणी प्रयोग अ‍ॅप, जियो टॅगिंग कामाचा समावेश आहे. ग्रुप सोडण्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

 आपले सरकार सेवा केंद्राला १२ हजाराची खिरापतसध्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालवणाºया कंपनीला दरमहा १२ हजार रुपये दिले जात आहेत. सरकारी कामे या ठिकाणी ग्रामसेवक डाटा एन्ट्री आॅपरेटरकडून करून घेतील. त्या ठिकाणी अडचणी असल्यास गटविकास अधिकारी यांच्यामार्फत कंपनीला माहिती दिली जाईल. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी संगणकीय माहिती देणे, ई-मेल करण्यासाठी इंटरनेट सुविधा नसणे, टेलिफोन सेवा नसणे, तांत्रिक अडचणी, डाटा एन्ट्री आॅपरेटर नसण्याच्या अडचणीही आहेत.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरWhatsAppव्हॉट्सअॅप