अकोला: ग्रामपंचायतच्या विविध विकासकामांमध्ये अफरातफर केल्याच्या प्रकरणात अकोट तालुक्यातील उमरा येथील तत्कालीन ग्रामसेवक मनोज नंदनवार यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी दिला.
अकोट तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतअंतर्गत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, तेराव्या वित्त आयोगांतर्गत विकासकामे, दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत कामे, ग्रामपंचायत भाडे वसुली, शौचालयांचे बांधकाम आदी कामांमध्ये अफरातफर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उमरा येथील तत्कालीन ग्रामसेवक मनोज नंदनकर यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी १५ फेब्रुवारी रोजी दिला. त्यामुळे विविध विकासकामांतील अफरातफर संबंधित ग्रामसेवकास चांगलीच भोवली. निलंबित ग्रामसेवक नंदनकर यांची तीन महिन्यांपूर्वीच उमरा येथून बदली करण्यात आली होती.