शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन, कामकाज ठप्प

By admin | Published: July 06, 2014 7:49 PM

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांच्या शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

अकोला : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांच्या शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींमधील २६५ ग्रामसेवक संपावर गेले आहे. त्यामुळे गावांमधील सर्व कामकाज ठप्प झाले आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असल्यामुळे ग्रामसेवकांनी गावात राहणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना ग्रामसेवकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ग्रामविकास अधिकार्‍यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, मग्रारोहयोकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, १0 ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी नेमण्यात यावा, प्रवास भत्ता तीन हजार रुपये करण्यात यावा, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करण्यात यावे, विनाचौकशी निलंबन थांबवावे, मग्रारोहयोच्या कामांची एकतर्फी चौकशी व वसुली बंद करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांपैकी कंत्राटी ग्रामसेवक वगळता अन्य ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतींच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकार्‍यांना सुपूर्द केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. शुक्रवारपर्यंंत शासनाच्या वतीने संपाची दखल घेण्यात आली नसल्याने संप सुरूच अशी भूमिका ग्रामसेवक संघटनेने घेतली आहे.