लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू: श्रावणाच्या दुसºया सोमवारी बोरगाव मंजू येथे श्री राजराजेश्वर शिव भक्तांनी १०१ भरण्यांची कावड यात्रा काढली. रविवारी येथील भाविकांनी काटेपूर्णा नदीचे पाणी आणून महादेवाला जलाभिषेक केला.सोमवारी सकाळीच कावड यात्रा शहरात ढोल भजनाच्या तालात दाखल झाली. या कावड यात्रेत शहरातील हजारो शिवभक्त सामील होऊन शिवनामाचा जयघोष केला. त्यामुळे, शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. दरम्यान, पालखी कावडमध्ये शंकर-पार्वती, महादेव पिंड, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा असा उत्कृष्ट देखावा केला होता. शहरात पालखी दाखल होऊन मुख्य मार्गावरून पवित्र तीर्थाने देव-देवतांचा जलाभिषेक करण्यात आला. या पालखी सोहळा मिरवणुकीमध्ये शिवभक्त, लहान थोर, अबालवृद्धांसह सर्वच धर्माचे लोक सहभागी झाले होते. तर शहरात ठिकठिकाणी आपल्या घराजवळ पालखीचे महिलांनी पूजा अर्चा केली.
बोरगावात भव्य कावड यात्रा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 7:56 PM
बोरगाव मंजू: श्रावणाच्या दुसºया सोमवारी बोरगाव मंजू येथे श्री राजराजेश्वर शिव भक्तांनी १०१ भरण्यांची कावड यात्रा काढली. रविवारी येथील भाविकांनी काटेपूर्णा नदीचे पाणी आणून महादेवाला जलाभिषेक केला.
ठळक मुद्देश्री राजराजेश्वर शिवभक्तांचा उपक्रमशिव भक्तांनी काढली १०१ भरण्यांची कावड यात्राकाटेपूर्णा नदीचे पाणी आणून केला महादेवाला जलाभिषेक