अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या महानगरात सुरू असलेल्या शिवजयंती सप्ताहात गुरुवारी स्थानीय शिवाजी पार्क येथे किल्ले बांधणी व रांगोळी स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज, १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज पार्क येथे शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यादिनी सकाळी ६ वाजता भव्य शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता पोवाडा स्पर्धा होणार असून, सायं. ६ वाजता दीपोत्सव करण्यात येऊन हजारो दिव्यांची आरास तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धांचा पारितोषिक वितरण व जयंती सोहळा होऊन जयंतीचे समापन करण्यात येणार आहे, अशी माहिती
अध्यक्ष अविनाश देशमुख, कार्याध्यक्ष पवन महल्ले, सचिव चंद्रकांत झटाले, शोभायात्रा प्रमुख पंकज जायले यांच्यासह समिती सदस्यांनी दिली आहे.
दरम्यान, गुरुवारी शिवाजी पार्क येथे प्रथम बच्चे कंपनीसाठी आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेत आदित्य यादव, करण पाल, श्लोक इजले, आयुष निंबाळकर, परिपोश पाचपोर, भावेश थोरात, निकिता मोहता, श्रेयस मोरे, जितेंद्र निराजे, समृद्धी ठाकूर, रोहन राऊत, आर्यन बैरागी, ओम गडम, निरंजन सदांशिव, दुर्गेश रंगारी, रुद्र चावडा, विराज मंडवे आदींनी सहभाग घेत किल्ले निर्माण केलेत. तर दुपारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या संगीता कोरपे, वृंदा कोरपे यांनी साकार केलेल्या या स्पर्धेत रूतुजा मानकर, दिव्या लाड, अश्विनी घाडगे, श्रावणी शिंदे, भाग्यश्री इंगळे, दुर्गा जपसरे, जमुना जपसरे आदींनी सहभाग घेत शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित रांगोळी काढून सर्वांना मोहित केले.