शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
2
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
3
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
4
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
5
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
6
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
7
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
8
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
9
उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम
10
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
11
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
12
Swiggy चा IPO 'या' तारखेपासून गुंतवणूकीसाठी खुला होण्याची शक्यता, पटापट चेक करा डिटेल्स
13
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
14
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
15
"मी जिवंत आहे आणि...", निधनाची अफवा पसरल्यानंतर नीना कुळकर्णींनी शेअर केली पोस्ट
16
Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम
17
सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
19
नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट
20
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा

चारा उत्पादक शेतक-यांना मिळणार अनुदान

By admin | Published: October 07, 2015 10:49 PM

हायड्रोपोनिक युनिटला मंजुरात दिली असून चारा त्वरित मिळण्यासाठी १६ हजार ६६६ युनिटचे लक्ष्यांक.

बुलडाणा : चारा टंचाईवर मात करण्यसाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैरण विकास कार्यक्रम जलदगतीने राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शेतकर्‍यांना ६ हजार रूपये प्रति युनिट अनुदान देण्यात येणार आहे. चारा त्वरित मिळावा यासाठी हायड्रोपोनिक युनिटचे १६ हजार ६६६ लक्ष्यांक देण्याचा निर्णय शासनाने ६ ऑक्टोबर रोजी घेतला आहे. राज्यातील पर्जन्यमानाची असमाधानकारक परिस्थिती विचारात घेऊन चारा टंचाई परिस्थितीवर मात करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्यास २५ कोटी रूपये निधीच्या तरतूदीसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय १४ सप्टेंबर २0१५ अन्वये गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, सदर कार्यक्रमाची प्रगती अपेक्षित गतीने चालू नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे सदर कार्यक्रमाच्या तातडीने अंमलबजावणीबाबत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात वैरण विकास कार्यक्रम जलदगतीने राबवावे, बियाण्यांची उचल लवकर करावी, उचल केलेल्या बियाण्यांची लागवड होणे आवश्यक आहे, याबाबतची खात्री संबधीत कृषी अधिकार्‍यांनी करावी, लागवड केलेल्या चारा पिकाची उगवण झाल्यानंतरच फोटो संबंधित कृषी सहाय्यकांनी काढावेत, सदर कार्यक्रमांतर्गत स्थानिक गरजा विचारात घेवून आवश्यकतेनुसार हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाव्दारे चारा लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा तसेच प्रगती अहवाल विभागीय सहसंचालक कृषी यांचेकडून दर पंधरा दिवसांनी प्राप्त करून घेवून शासनास सादर करावा, आदी सूचनांचा समावेश आहे.

हायड्रोपोनिक युनिट म्हणजे काय ?

चारा तयार करण्यासाठी मका, गहू यांचा वापर प्राधान्याने करण्यात येतो. या धान्यांना सोडियम हायपोक्लोराइड किंवा ई. एम. च्या द्रावणात बीज प्रक्रिया करून घेतले जाते. नंतर हे धान्य १२ तास भिजत ठेवून २४ तास अंधार्‍या खोलीत ठेवले जाते. त्यानंतर ट्रेमध्ये पसरवले जाते. एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फोगर सिस्टिमद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून ६ ते ७ वेळा पाणी दिले जाते. एकूण २00 लीटर पाणी दिवसभरात वापरले जाते. ही सर्व यंत्रणा स्वयंचलीत करण्यात आली आहे. या पद्धतीद्वारे आठ दिवसांत चारा उपलब्ध होतो. या यंत्रणेत ट्रेचा वापर केल्याने मातीशिवाय चारा उत्पादन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली आहे. फक्त पाण्यावरच या चार्‍याची सात ते आठ दिवसांत २0 ते २५ सेंमी उंचीपयर्ंत वाढ होते. एका ट्रेमधील पावणेदोन किलो गव्हाच्या धान्यापासून १४ ते १६ किलो लुसलुशीत चारा जनावरांना खाण्यासाठी तयार होत आहे. एक किलो चारा तयार करण्यासाठी सर्वसाधारण अडीच ते तीन रुपये खर्च येतो. असा चार तयार करणार्‍या युनिटला हायड्रोपोनिक युनिट असे म्हणतात.