शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

दोन महिन्यांपासून निराधार, श्रावण बाळ योजनेचे अनुदान थकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:22 AM

संतोषकुमार गवई पातूर : गेल्या दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना अनुदान थकल्याने वृद्ध, गोरगरीब वंचित ...

संतोषकुमार गवई

पातूर : गेल्या दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना अनुदान थकल्याने वृद्ध, गोरगरीब वंचित लाभार्थी संकटात सापडले आहेत. तालुक्यातील श्रावण बाळ योजनेतील ५०९९ व संजय गांधी निराधार योजनेतील २६५६ लाभार्थी आहेत. वयोवृद्ध निराधार, गोरगरीब, विधवा परितक्त्या अपंग लाभार्थींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळणारे अनुदान अद्यापही प्राप्त झाले नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. श्रावण बाळ योजनेतील पाच हजार ९९ लाभार्थ्यांपैकी अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थी वगळता उर्वरित तीन हजार ८५५ लाभार्थींचे अनुदान अद्यापही शासनाकडून प्राप्त झाले नाही. तसेच लाभार्थींना वाटप करण्यात आलेले नाही. संजय गांधी निराधार योजनेतील दोन हजार ६५६ लाभार्थ्यांपैकी अनुसूचित जातीच्या ४३३ लाभार्थ्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. गेल्या दीड वर्षापासून शासनस्तरावरून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान अनियमित स्वरूपाचे मिळत असल्यामुळे जगावे की मरावे, अशी व्यथा गरजू लाभार्थींची झाली आहे. तालुक्यात जवळपास आठ हजार लाभार्थीं आर्थिक संकटात सापडले आहेत. लाभार्थी पातूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गरजू आणि गरीब नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.

-------------------

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे जुलै महिन्याचे शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्याचे अनुदान शासनाकडून मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-जी. एम. डाहोरे, नायब तहसीलदार, पातूर.