कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील जास्तीत-जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेणे, कोरोना लसीकरणाला गती देणे, तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी उपविभागीय अभयसिंह मोहिते, तहसीलदार गजानन हामंद, ठाणेदार महादेवराव पडघान, एम. एस. आगलावे, डॉ. शरयू बिहाडे, डॉ. किसन पंजवानी यांनी परीश्रम घेतले.
------------------------------------
८ मेपासून पिंजर परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या घसरली आहे. कोरोनाबाधितांचे विलगीकरण केल्यामुळे संसर्ग वाढला नाही.
- गजानन हामंद, तहसीलदार, बार्शीटाकळी
-------------------------
पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण सात उपकेंद्र असून, प्रत्येक ठिकाणी कोरोना चाचणी शिबिरे, बॅंकेत नागरिकांची कोरोना चाचणी, लसीकरणाला गती, घरोघरी जनजागृती, तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळेच बाधितांची संख्या कमी झाली आहे.
-शरयू बिहाडे, मेडिकल ऑफिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंजर