१०५८ जणांनी केली काेराेना चाचणी
अकाेला : शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे १०५८ जणांनी बुधवारी चाचणी केली. यामध्ये १८३ जणांनी आरटीपीसीआर व ८७५ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
भाजी बाजारात उसळली गर्दी
अकाेला : काेराेना विषाणूमुळे बाधित रुग्णांची संख्या कमी हाेत चालली असून, शासनाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, जठारपेठ चाैकातील भाजी बाजारात ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी नियमांचे पालन न करताच नागरिकांनी भाजीपाला व इतर साहित्याची खरेदी केली.