लोकमत न्यूज नेटवर्कपारस: संपूर्ण कर्जमाफीसह आपल्या विविध मागण्यांच्या संदर्भात पारसमधील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपास आज शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. संपूर्ण व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून स्वत: पदयात्रेत सहभाग दर्शविला. सकाळी १० वाजता पदयात्रेस सुरुवात झाली. पोळा चौक, म. फुले चौक, गांधी चौक, बरड विभागातून निघालेल्या पदयात्रेची ग्रामपंचायतसमोर सांगता झाली. विविध मागण्यांचे निवेदन पदयात्रेमध्ये सांगता झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी बाळापूर यांना देण्यात आले. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात पाचशे शेतकऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सुहास लांडे, रामराव खोपडे, मनोहर कारंजकर, सहदेवराव वानखडे, कालीन लांडे, अ. रफीक शायर डॉ. दादाराव लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी काळी फीत लावून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. याप्रसंगी उपसरपंच बब्बूशेठ, आरीफखान, नारायण खंडारे, समाधान खंडारे, दिलीप लांडे, डिगांबर लांडे, प्रमोद सरोदे, निखिल सोळंके, सदाशिव बिल्लेवार, वहिदभाई महादेव सावंत, यशवंत चरखे, रामदास खंडारेसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. बंडू इंगळे यांनी आभार मानले. एसडीओंना निवेदन ४उपविभागीय अधिकारी बाळापूर यांना पारसच्या शेतकऱ्यांनी निवेदन दिले. याप्रसंगी डॉ. दादाराव लांडे, श्यामराव खोपडे, इलीयास बेग, वाहेदभाई कालीन लांडे, आरीफखान, बंडू इंगळे, दुधाळकर, बिल्लेवार आदी शेतकरी उपस्थित होते.आमदारांना शेतकऱ्यांचा घेराव ४आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार बळीराम सिरस्कार यांना पोळा चौकात घेराव घातला. यावेळी त्यांनी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटित होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांसमवेत फु ले चौकापर्यंत येऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पारस येथे कडकडीत बंद
By admin | Published: June 06, 2017 12:44 AM