शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

महान धरण १00 टक्केच्या उंबरठय़ावर!

By admin | Published: October 03, 2016 2:37 AM

काटेपुर्णा (महान) धरणाची पाणी पातळी ९८.४0 टक्क्यावर पोहचल्याने पाणी सोडण्याचे संकेत दिले आहेत.

महान (जि. अकोला), दि. २- संपूर्ण अकोला शहरासह महानवासीयांचे लक्ष लागलेल्या महान धरणाची पाणी पातळी १00 टक्क्यापर्यंंत पोहोचत असल्याने, अकोला शहरासह नदीकाठावरील ८४ खेडीगावासाठी ही आनंदाची बाब आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे तसेच २ ऑक्टोबरला सकाळी १0 वाजता झालेल्या मुसळधार पावसाने महान धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढून, १00 टक्कय़ाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचले आहे.मागील महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारल्याने ३0 ऑगस्टपासून महान धरणाच्या जलसाठय़ात वाढ होणे पूर्णपणे ठप्प झाले होते. यातून अकोला शहराला पाणीपुरवठा होत असल्याने दररोज १ से. मी. पाणी पातळी कमी होत होती. त्यावेळी धरणाची पाणी पातळी ८७ टक्कय़ाच्यावर थांबली होती. परंतु मागच्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने महान धरणाच्या जलसाठय़ात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता मुसळधार पाऊस झाल्याने महान धरणाच्या जलसाठय़ात दुपारी १२ वाजेपासून १0-१0 पॉइंटने झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजताची वाढ बघता असे वाटत होते, की धरणाची पाणी पातळी दुपारी ३ वाजेपर्यंंत १00 टक्के होऊन गेट उघडावे लागणार; परंतु दुपारी ३ वाजतापासून पाणी पा तळी स्थिर झाल्याने गेट उघडण्याची वेळ आली नाही. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महान धरणात ११४0.७0 फूट, ३४७.६९ मीटर, ८४.९६९ द.ल.घ.मी. व ९८.४0 टक्के जलसाठय़ाची नोंद करण्यात आली आहे. मालेगाव, काटाकोंडाळा, अमनवाडी, जऊळका परिसरात एकाच वेळी दमदार पाऊस झाल्यास महान धरणाची पा तळी १00 टक्कय़ांपर्यंंत पोहचून, गेट उघडून त्यामधील शिल्लक पाण्याचा विसर्ग होणार, हे विशेष. धरणातील वाढत्या जलसाठय़ाकडे शाखा अभियंता ए. ए. सय्यद, एस. व्ही. जानोरकार, मनोज पाठक, शंकर खरात, शेषराव लुले, रमेश हातोलकर, नाना शिराळे, अकबर शहा यांच्यासह अन्य कर्मचारी लक्ष ठेवून नियोजन करीत आहेत.