अकोला : लग्नानंतर प्रत्येक मुलीला माहेरी आपल्या नवऱ्याचं काैतुक व्हावं, अस वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतु जेव्हा हेच काैतुक प्रमाणापेक्षा जास्त होतं व नकळतपणे माहेरच्या माणसांचं आपल्याकडे दुर्लक्ष होतं असं जेव्हा त्या मुलीला वाटू लागतं तेव्हा त्या मुलीची ही गोड तक्रार नक्कीच ऐकायला मिळते आणि ती म्हणजेच “अस माहेर नको गं बाई”
याला अनुसरुन सोनी मराठी वाहिनीवरील सुरु असलेली ही मालिका अत्यंत अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाली आहे आणि याच निमित्ताने लोकमत सखी मंच व सोनी मराठी यांच्या वतीने सखी सदस्यांसाठी ‘जावई म्हणे असे सासर सुरेख बाई’ ही एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शुक्रवार दि. २२ जानेवारी रोजी लोकमत फेसबुकवर ऑनलाइन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनी मराठीवरील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातल्या सखी सदस्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी “अस्सं माहेर नको गं बाई ”. या मालिकेतील स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर यांनी मालिकेविषयी, त्यांच्या भुमिकेविषयी तसेच सेटवरच्या अनेक गमतीजमती सांगत अगदी हसतखेळत संवाद साधला. स्वानंदी टिकेकर हिने सखींच्या आलेल्या गाण्याच्या फर्माइशीही पूर्ण करत आपल्या गोड आवाजात गाणी सादर करुन सखींना मंत्रमुग्ध केले तर पुष्कराजनेही रॅपिड फायर प्रश्नांची उत्तरे दिली.
सोबत जिगरबाज व श्रीमंताघरची सून या मालिकेतील पल्लवी पाटील, अमृता पवार, यशोमान आपटे व रूपलनंद याही कलाकारांनी मालिका व त्यांच्या भुमिकेबद्दल अनुभव सांगितले. लोकमत सखी मंच व सोनी मराठी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ जावई म्हणे अस्सं सासर सुरेख बाई’ या स्पर्धेस सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच या स्पर्धेतील काही निवडक विजेत्यांना या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी करण्यात आले होते. यावेळी विजेत्या सखींनी माहेरच्यांशी आपल्या नवऱ्याचं नातं कसं आहे याबद्दलच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, नावीन्यपूर्ण कथा, उत्तम सादरीकरण या सगळ्यांच्या बळावर एकंदरीत सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाचा आनंद देत असून, सर्व मालिका व कलाकारांना प्रेक्षकांची पसंती लाभ आहे. “अस्सं माहेर नको गं बाई ” ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.०० वा., श्रीमंताघरची सून रात्री ०८.००वा. तर जिगरबाज ही मालिका रात्री १०.३०. वा. प्रसारित होते. लाइव्ह कार्यक्रम सुरु असतानाही सखींना मालिका व कलाकरांबद्दल प्रश्न विचारण्यात आले व सखींनीही प्रश्नांची उत्तरे देऊन प्रतिसाद दिला तसेच यंदाच्या वर्षी लोकमत सखी सदस्यांसाठी २०२१ चे नूतनीकरण नि:शुल्क केल असून, त्याच ओळखपत्रावर आगामी कार्यक्रमांना प्रवेश दिला जाणार असून, लोकमत समूहाच्या वतीने सखी सदस्यांसाठी ही संक्रांतीच्या शुभशकुनाची भेट असणार आहे.
स्पर्धेतील विजेतेरोहिणी यादव, अहमदनगरलुनाक्षी सोनारकर, नागपूरविजया कातकाडे, परभणीपूर्वा निकम, नाशिकडाॅ. शिल्पा जोशी, पुणे