लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्थानिक एडेड हायस्कूलची हरित सेना वृक्ष लागवडीसाठी सरसावली. रिमझिम पावसाच्या सरींच्या साक्षीने शनिवारी हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.वृक्ष लागवडीच्या आवाहनाला शाळेच्या वतीने प्रतिसाद देण्यात आला. वड, कडुलिंब, पिंपळ, बेल, मोह, उंबर या जातीच्या ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. ही पारंपारिक झाडे ६० ते ७० टक्के आॅक्सिजन देऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे कार्य करतात, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा हरित सेना प्रमुख आर. एन. जाधव यांनी सांगितले. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका दामले, पर्यवेक्षिका निकाळजे शिक्षक उपस्थित होते.
शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपणबुलडाणा : पांगरी येथे शिक्षक सेनेच्या वतीने १०० झाडे लावण्यात आली. विद्यार्थ्यांना ५०० रोपे वितरित करण्यात आली. याप्रसंगी अॅड. सुजित उबरहंडे, प्राचार्य आर. एस. वानखेडे, संजय राजपूत, महेंद्र बोरकर, शाम साखळीकर, गजानन पवार, सुरेश काळे, गणेश सावळे, गजानन गायकवाड यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक हजर होते.