- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: जागतिक पातळीवर अकोला जिल्ह्याने तापमानाच्या बाबतीत यंदा रेकॉर्ड ब्रेक केला. अकोलाचे तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. जून महिन्यातदेखील ४५ अंश सेल्सिअस तापमान गेले. ही परिस्थिती केवळ अकोला जिल्ह्याचीच नाही तर संपूर्ण देशाच्या तापमानात वाढ झालेली आढळून आली. जागतिक पातळीवरदेखील तापमानाची समस्या उत्पन्न झाली आहे. विश्वातील प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान २५ वर्षात ५०० रोपे लावून जगविली तरच ग्लोबल वॉर्मिंगवर विजय मिळविता येईल. यासाठी अकोल्यातील ग्रीन ब्रिगेड सरसावली आहे. दरवर्षी पन्नास हजार रोपे लावण्याचा संकल्प ग्रीन ब्रिगेडने केला आहे.सन २०१० पासून उद्योजक विवेक पारसकर यांनी जिल्ह्यात स्वखर्चाने वृक्षारोपण केले. अनियमित पावसामुळे मधली तीन वर्षे वृक्षारोपण करता आले नाही, याची खंत पारसकर यांना वाटते. पावसाचा अनियमितपणा सुरू च राहील. त्यामुळे पावसाशी सांगड घालत वृक्षारोपण करावेच लागेल, या भावनेतून पारसकर यांनी ग्रीन ब्रिगेडची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील वाढते तापमान बघता २०१२ मध्ये ग्रीन ब्रिगेडची स्थापना करू न, सातत्याने चार वर्षे पारसकर यांनी वृक्षारोपण केले.पूर्वी एका घरात एकच कूलर वापरायचे. आता प्रत्येक घरात किमान तीन कूलर असतात. पाण्याची कमतरता आणि फ्लॅट संस्कृती वाढल्याने एअर कंडिशनरचा वापर वाढला. तापमानापासून तात्पुरते रक्षणासाठी कूलर किंवा एसी आहेत; परंतु हा कायमस्वरू पी उपाय नाही. एका बाजूने वातावरणातील उष्णता वाढत आहे तर दुसरीकडे झाडांची संख्या कमी होत आहे. स्वातंत्र्यापूर्वी होणारे वृक्षारोपण पर्यावरणातील बदल पाहून व्हायचे. आता शासन जे वृक्षारोपण करत आहे त्यात आकड्यांना महत्त्व आहे. कोटीच्या घरात वृक्षारोपण झालेली आकडे पाहतो व वाचतो; मात्र प्रत्यक्षात वृक्षारोपण होर्डिंग्ज आणि जाहिरातीपुरते कागदोपत्री झालेले दिसते. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या २० वर्षात तापमान ५७ अंश होईल. जमिनीतील पाणीदेखील पाचशे-सातशे फूट खोल गेलेले असेल, अशी भयाण परिस्थिती निर्माण होईल.ग्रीन ब्रिगेडने वृक्षारोपणात चार ते पाच वर्षे प्रामाणिक कार्य केले आहे. जोपर्यंत प्रत्येक नागरिक ग्रीन ब्रिगेडला साथ देत नाही, तोपर्यंत वाढत्या तापमानावर नियंत्रण आणता येणार नाही.
काय करता येईल
- १५ जूनपासून ३१ डिसेंबरपर्यंत वृक्षारोपण करत रहावे.
- प्रत्येकाने घराभोवती ५ रोपे लावून संगोपन करावे.
- शासकीय-निमशासकीय, खासगी संस्थांनी वृक्षारोपण करावे.
- कूलर, एसी, ग्रीननेटसाठी खर्च करण्यापेक्षा वृक्षराई निर्माण करावी.
- ग्रीन ब्रिगेडच्या उपक्रमात सहभागी व्हावे.
‘‘पर्यावरण मंत्रालय व पर्यावरण मंत्री यांनी शासकीय निधीचा योग्य वापर करू न पर्यावरण संतुलन राखण्यासाठी कार्य करावे, यासाठी एक चळवळ निर्माण करणे आवश्यक आहे. कारण वृक्षारोपणाची सामाजिक चळवळ व क्रांतीच ग्लोबल वॉर्मिंगवर मात करू शकणार आहे.’’विवेक पारसकरसंस्थापक अध्यक्ष,ग्रीन ब्रिगेड.