ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी माजी सरपंच गोकुळा वावरे, ग्राम विकास अधिकारी बी. एस.गावंडे यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले. यावेळी पोलीस पाटील कल्पना शिरसाट यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. महात्मा जोतिबा फुले विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभिवादन करण्यात आले.
गुरुदेव सेवा मंडळातर्फे अभिवादन
निहिदा: अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ बार्शिटाकळी तालुकातर्फे महापरीनिर्वाण दिनानिमित्त पंचायत समिती बार्शिटाकळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचार प्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी, पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, तालुका प्रचार प्रमुख देविदास कावरे, प्रसिद्धी प्रमुख जेठाभाई पटेल, संघटक प्रितेश गवई, पंचायत समिती सदस्य धनंजय काकड, राजकुमार ससाने उपस्थित होते.
फोटो:
चिखलगाव येथे महापरिनिर्वाण दिन
चिखलगाव: महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पित करण्यात आली सकाळी विहारात बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करीत समाजबांधवांसह नागरिकांनी आदरांजली अर्पित केली.
जि.प.शाळा किनखेड पूर्णा येथे अभिवादन
चोहोट्टा बाजार: भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनखेड पूर्णा येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप ओइंबे, सदस्य रामदास ओइंबे, ज्ञानेश्वर गोंडचर, मुख्याध्यापक संजय सरदार, शिक्षक नूतन देशपांडे, संतोष झामरे, बाळकृष्ण वसतकार, विनोद शिवरकार, उमा दामोदर उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता सातवीचा विद्यार्थी अश्वजित प्रमोद ओइंबे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
फोटो: