राम मंदिरात राम नवमी उत्सवाची जय्यत तयारी
अकोला संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात राम नवमी निमित्त उत्सवाची तयारी सुरू झाली असून, भक्तांना ऑनलाइन दर्शन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिरांच्या सभामंडतपात अकोला शहरातील सुप्रसिद्ध सिद्धहस्त रांगोळी कलाकार अमृता ताई कुशल सेनाड यांनी भक्तांच्या सुविधेसाठी मंदिराच्या गर्भगृहात दहा-बाराची प्रभू रामचंद्राच्या बालपणाची सुरेख रांगोळी काढली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी रोजी सकाळी ध्वजारोहण धर्मध्वजची स्थापना होऊन कार्यक्रमाला शुभारंभ होणार आहे. रामायण पाठ, सुंदर कांड, हनुमान चालिसा, रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष पाठ, ५६ भोग दर्शन कार्यक्रम केवळ औपचारिक स्वरूपात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मंदिराचे ट्रस्टी भाग घेणार आहेत. श्रीराम हरी या संस्थेच्या वतीने सुमन अग्रवाल विजय अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी मनिष शहा कल्याण अनिल मानधने गिरीराज तिवारी गिरीश जोशी संजय अग्रवाल सागर भारूका आदी उत्सवासाठी परिश्रम घेत आहे.