सर्वोपचार रुग्णालयात शुकशुकाट
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रविवारीदेखील रुग्णालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गर्दी दिसून येते. मात्र, २१ फेब्रुवारी रोजी लॉकडाऊनमुळे सर्वोपचार रुग्णालयात शुकशुकाट दिसून आला.
जुन्या शहरातील नाल्यांची दुरवस्था
अकोला : जुन्या शहरातील बाळापूर रोड, भिरडवाडी, सोपीनाथनगर, डोबकी रोड या भागातील प्रमुख नाल्या अनेक ठिकाणी तुटल्या असून, त्यामध्ये सांडपाण्यातील गाळ साचल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे या नाल्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या नाल्यांची दुरुस्ती करून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
अकोला : वातावरणातील बदलाचा परिणाम आरोग्यावर दिसू लागला आहे. अनेकांना सर्दी, खोकल्यासह किरकोळ तापाचेही लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.