राजरत्न सिरसाटअकोला : विदर्भातील पाऊस अनिश्चित स्वरू पाचा झाला आहे. सलग दहा वर्षांपासून सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. मागच्यावर्षी पावसाने साथ दिली; पण पाणी अडविण्यासाठीचे उपचार न झाल्याने भूगर्भपातळी सरासरी दोन मीटरच्यावर घसरली असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. जेथे जलसंवर्धन उपचाराची कामे झाली तेथे मात्र भूगर्भपातळीत सुधारणा झाल्याचे निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढले आहे.या अल्प पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भात शापित खारपाणपट्टय़ाला सोसावा लागत आहे. खारपाणपट्टय़ातील आम्ल,फ्लोराईडयुक्त खारे पाणी पिण्यासाठी योग्य नसून, या पाण्यात शेती करणे कठीण झाल्याने शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यातच भूगर्भ पातळीतून अनेक प्रकारे अव्याहतपणे पाणी उपसले जात असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी आणखी खालावत चालली आहे.पश्चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४0 ते ५0 किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८९४ गावे या खारपाणपट्टय़ात मोडतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र असून, इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र १0 टक्क्य़ांच्या आत आहे. नेमके याच भागात सरासरी पाऊस पडण्याचे प्रमाण घसरले आहे. परिणामी, भूगर्भ पातळीत जलपुनर्भरण होत नसल्याने या भागातील विहिरी, हातपंपाचे पाणी आटत चालले आहे. पश्चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४0 ते ५0 किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८९४ गावे या खारपाणपट्टय़ात मोडतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र असून, इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र १0 टक्क्य़ांच्या आत आहे. नेमके याच भागात सरासरी पाऊस पडण्याचे प्रमाण घसरले आहे. परिणामी, भूगर्भ पातळीत जलपुनर्भरण होत नसल्याने या भागातील विहिरी, हातपंपाचे पाणी आटत चालले आहे. अकोला जिल्हय़ाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ७00 मि.मी. आहे. मागील वर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत ७१८.१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस पूर्ण पावसाळ्य़ात १४४ तास ३८ मिनिटात पडला, तर ऑक्टोबर महिन्यात पाच दिवसात तसेच ११ तास ४२ मिनिटात ८९.७ मि.मी.पडला. म्हणजेच ४३ दिवसात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ८0७.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.- पुनर्भरण झाले, पाणी पातळी वाढली !दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पानलोट क्षेत्रावर केलेल्या अभ्यासावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार ज्या भागात शेती बांधबंधिस्ती, नाला खोलीकरण, साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध, अशी कामे झाली त्या शिवारातील विहिरींना बर्यापैकी जलसाठा आहे, अशा भागात सरासरी ४.७८ टक्के पावसाचे पाणी सरळ भूगर्भात जाऊन मिळाल्याने येथील पाणी पातळी बर्यापैकी आहे; पण जेथे कामे झाली नाहीत तेथील पातळी हेक्टरी १४.५ मीटरपर्यंत खाली आली. -जेथे पुनर्भरणाची कामे झाली नाहीत, तेथील म्हणजेच अकोला जिल्हय़ातील नव्हे, तर विदर्भातील पाण्याची पातळी यावर्षी सरासरी दोन मीटरने घसरली असल्याचा एका अभ्यासाअंती निष्कर्ष काढण्यात आला आहे. याकरिता मूलस्थानी जलसंधारण प्रभावीपणे राबवावे लागणार आहे.- डॉ. सुभाष टाले,विभाग प्रमुख,मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी , डॉ.पंदेकृवि,अकोला.
विदर्भातील भूजल पातळी दोन मीटरच्यावर घटली!
By admin | Published: May 07, 2017 2:42 AM