पातूर: महाराष्ट्र बियाणे महामंडळाकडून घेऊन पेरलेले भुईमुगाचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याची तक्रार तालुक्यातील राहेर येथील शेतकर्यांनी पातूर तालुका कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे केली आहे. तसेच नुकसान भरपाईची मागणी केली आहे.राहेर येथील शेतकर्यांनी बियाणे महामंडळाच्या उन्हाळी भुईमूग बियाण्याची पेरणी केली; परंतु हे बियाणे निकृष्ट दर्जाचे आहे, अशी शेतकर्यांची तक्रार आहे. या बियाण्यांपासून भुईमुगाचे झाड उगवले; परंतु या झाडाची वाढ दुपटीपेक्षा जास्त झाली. झाड उंचच वाढत गेले तर या झाडाला शेंगा लागल्या नाही. त्यामुळे शेतकर्यांची भुईमुगाचे पीक येण्याची शक्यता मावळली व पर्यायाने शेतकर्यांचे नुकसान झाले. उन्हाळी भुईमुगाचे उत्पन्न तर होणारच नाही; परंतु शेताची मशागत व पेरणीचा खर्च वाया गेला. पर्यायाने आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे मदत देण्याची मागणी सोपान नारायण माळी, श्रीकृष्ण खराटे, सिद्धार्थ वानखडे, जयराम कोळसे, प्रकाश कोळसे, प्रकाश कोळसे, विजय ढोरे, संतोष कोळसे यांच्यासह इतर अनेक शेतकर्यांनी केली आहे.
भुईमुगाचे बियाणे निघाले निकृष्ट
By admin | Published: May 07, 2017 2:37 AM