शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
2
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
3
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
4
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
5
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
6
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
7
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
8
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
9
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
11
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
13
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
14
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
15
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
16
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
17
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
18
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
19
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
20
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

‘भूजल मसुदा नियम’ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 3:24 PM

आक्षेप व हरकती नोंदविल्या गेल्या; मात्र त्यानंतर शासनस्तरावरून विशेष हालचाल झाली नाही.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाणी वापरासंदर्भातील ‘महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) मसुदा नियम २०१८’ जुलै २०१८ मध्ये तयार झाला. याअंतर्गत घालून दिलेल्या नियमांबाबत सप्टेंबर २०१९ अखेरपर्यंत आक्षेप आणि हरकती मागविण्यात आल्या. मात्र, जुलै २०१८ ते फेब्रूवारी २०२० असे १८ महिने उलटूनही हा नवा नियम अद्याप कागदावरच रेंगाळत असून शासनस्तरावरून प्रशासनाला यासंदर्भात कुठलेही निर्देश मिळालेले नाहीत. शासनाच्या या उदासिनतेप्रती नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झालेला आहे.'भूजल मसूदा नियम' हा पाणी वापरासंदर्भातील कायदा नव्याने अंमलात येणार होता. त्यातील नियमांची अधिसूचना शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून २५ जुलै २०१८ रोजी जाहीर करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र भूजल मसुदा नियम लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात विहिर अथवा कुपनलिका घेतल्यास त्याची नोंद १८० दिवसांच्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करावी लागणार आहे. शेतकºयांना आपल्या शेतात कोणत्या पिकाची लागवड करायची, हे शासनाच्या धोरणानुसार ठरवावे लागणार असून विहीर, विंधनविहीर खोदण्यासाठीही शासनाची परवानगी घेत अस्तित्वातील खोल विहिरीतून शेतीसाठी पाण्याचा उपसा झाल्यास महसूल विभागाकडून त्यासाठी कर आकारला जाणार आहे. यासह इतरही नियमांचा यात समावेश आहे. दरम्यान, शेतकºयांच्या दृष्टीकोणातून जाचक ठरणार असलेल्या भुजल मसुद्यास राज्यभरातून विरोध दर्शविण्यात आला. त्यानुसार, शासनाकडून आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दरम्यानच्या कालावधीत आक्षेप व हरकती नोंदविल्या गेल्या; मात्र त्यानंतर शासनस्तरावरून विशेष हालचाल झाली नाही. परिणामी, दीड वर्ष उलटूनही भूजल मसुदा नियम लागू झालेला नाही.

‘भूजल मसुदा नियम २०१८’बाबत प्राप्त आक्षेप व हरकती ‘आॅनलाईन’ स्वरूपात शासनाकडे पाठविण्यात आल्या; मात्र, भूजल मसुदा नियमाबाबत पुढे काय कार्यवाही करायची, यासंदर्भात शासनाकडून अद्यापपर्यंत कुठलेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत.- एस.एस. कडूवरिष्ठ वैज्ञानिक, भूजल वसर्वेक्षण विकास यंत्रणा, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम