अकोला (आद्य किर्तनकार स्व. आमले महाराज साहित्य नगरी) : संस्कार शिबिरातून हजारो युवक दरवर्षी बाहेर पडतात, महाराजांचा विचार घेऊन ते काम करू लागतात या युवकांना दिशा मिळाली पाहीजे, असे कार्य मुळ संस्थेने करणेसुध्दा तितकेच महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. हा धागा लक्षात ठेऊन सेवा मंडळाची दिशा ठरली पाहिजे, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी मांडले. डाँ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात सुरु असलेल्या सहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी श्री गुरुदेव सेवा मंडळाची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी, डॉ. माधवराव सुर्यवंशी, ज्येष्ट प्रचारक तिमांडे महाराज, ग्रामगिताचार्य सुनील महाराज लांजुळकर आदी उपस्थित होते. या परिसंवादाचे प्रमुख वत्तेâ म्हणून आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी युवकांना ग्रामगीतेच्या आचरणाचे आवाहन केले. राष्ट्रसंतांनी प्रचारकाकडे विशेष लक्ष दिले आहे. सध्याच्या काळात गावागावात महाराजांच्या विचारांचे कार्यक्रम होत आहेत. मात्र या कार्यक्रमाला पाहिजे ती दिशा मिळाली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. ग्रामगीता नुसतेच वाचून चालणार नाही तर ती आचरणात सुद्धा आणली पाहिजे, यासाठी गुरुदेव सेवा मंडळाने गावपातळीवर काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे, मात्र कार्याला दिशा मिळाली नाही. हि दिशा मिळण्यासाठी सेवा मंडळाच्या प्रत्येक कार्यकत्र्याने आपले वर्तन चांगले ठेवले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी येथे केले. आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले युवक आपल्या भाषणातून मांडले. आज या संमेलनातून शेकडो युवक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत, आणि राष्ट्रसंतांचा विचार त्यांनी घराघरात पोहोचवला पाहिजे, असा आशावाद व्यक्त करीत राष्ट्रसंतांची ग्रामविकास चळवळ विषद केली. गावाचा विकास करायचा असेल तर युवकांनी जागृत झालं पाहिजे. ही जागृती राष्ट्रसंतांच्या विचारातून मिळेल. त्यासाठी राष्ट्रसंतांचे साहित्याने प्रत्येकांने वाचली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. युवकांनी नुसते शिक्षण घेऊन चालणार नाही तर रोजगाराकडे वळले पाहिजे, गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणांनी इतर संप्रदायांंना दिशा देण्याचे काम राष्ट्रसंताच्या विचारातून निर्भयता मिळते, ही निर्भयता सेवा मंडळातील युवकांमध्ये आली पाहिजेत, असा विचार त्यांनी व्यक्त केला. या परिसंवादाचे सुत्रसंचलन प्रा. मनिष देशमुख यांनी केले.
युवकांचा सर्वांगिण विकास करण्याची तळमळ असलेला समुह म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ - आचार्य वेरुळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 2:43 PM
भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे.
ठळक मुद्देराष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी श्री गुरुदेव सेवा मंडळाची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले युवक आपल्या भाषणातून मांडले.