लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीएसटी पोर्टलवर आलेल्या देशभरातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी परिषदेने कंपोझिशन स्कीम (आपसमेळ योजना) र्मयादा ३0 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. जे व्यापारी-उद्योजक या योजनेपासून वंचित राहिले हो ते, त्या सर्वांसाठी आता ही संधी परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अकोल्यातील उद्योजकही मोठय़ा प्रमाणात या योजनेचा लाभ घेत आहेत.१ जुलैपासून देशभरात जीएसटी कायदा लागू झाला. ७५ लाखांपर्यंंत वार्षिक उलाढाल करीत असलेल्या व्यवसाय- उद्योजकांसाठी परिषदेने कंपोझिशन स्कीम (आपसमेळ योजना) अस्तित्वात आणली. ज्यांना कर प्रणालीत रिटर्न नको आहेत, अशा व्यापारी उद्योजकांसाठी ही योजना होती; मात्र या योजनेसाठी केवळ १६ ऑगस्टपर्यंतच मुदत दिली गेली होती. त्यामुळे अकोल्यासह देशभरातील हजारो व्या पारी-उद्योजक या योजनेपासून वंचित राहिले. अकोल्यातील पाचशेच्यावर व्यापारी या योजनेपासून वंचित राहिले होते. त्यामुळे अकोल्यासह देशभरातील करदाते आणि करसल्लागार यांनी जीएसटीच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रारी नोंदविल्यात. त्याची गंभीर दखल घेत परिषद सदस्यांनी हैदराबाद येथे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कंपोझिशन स्कीमची काळर्मयादा ३0 सप्टेंबरपर्यंंत वाढविण्यात आली. त्याचा लाभ आता अकोल्यासह देशभरातील व्यापारी घेत आहेत. आपसमेळ योजनेकरिता पात्रतेबाबतचे निकष व करयाबाब तचे निकष आदी माहिती जीएसटी कायद्याच्या कलम १0 मध्ये दिली आहे.
कंपोझिशन स्कीमपासून अकोल्यातील शेकडो व्यापारी वंचि त झाल्याच्या तक्रारी अकोल्यातून होत्या. प्रातिनिधिक तत्त्वावर काहींनी जीएसटी पोर्टलवरही तक्रार नोंदविली हो ती. आता परिषदेने ३0 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंंत संधी दिली आहे. त्याचा लाभ व्यापार्यांनी घ्यावा, शक्यतोवर त्याआधी भरणा करावा, काही अडचण असल्यास मदत कक्षातील जीएसटी अधिकारी अभिजित नागले यांच्याकडे विचारणा करावी.-एस.एन. शेंडगे, राज्य कर उपायुक्त, जीएसटी कार्यालय अकोला.