अकोला: जळगाव खान्देश येथून एका प्रख्यात कंपनीने कन्टेनरद्वारे पाठवलेला साबणचा साठा अकाेल्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने ताब्यात घेण्याची कारवाइ शनिवारी केली. अकोला शहरातील नवीन किराणा मार्केट येथे एका चारचाकी कंन्टेनरमध्ये साबणचा साठा आणन्यात आल्याची माहिती काही जागरूक व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा साठा पकडण्याची कारवाई केली.
शहरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या नवीन किराणा मार्केटमध्ये जळगाव खान्देश येथून एका प्रख्यात कंपनीचे साबन वस्तू व सेवा कराची रक्कम चूकवून चारचाकी कंन्टेनर दाखल झाल्याची माहिती ‘जीएसटी’ विभागाला मिळाली. या माहितीवरुन जीएसटी विभागाने सदर कंपनीच्या साबणाच्या साठ्यासह कंन्टेनर ताब्यात घेतला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू होती.