शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

जीएसटीमुळे देशातील ७५ टक्के वस्तू होणार स्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:58 AM

चाटर्ड अकाउंटन्टचा दावा : व्यापारी संघटना अजूनही संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुलैपासून देशभरात लागू होत असलेल्या (वस्तू व सेवा कर) जीएसटीमुळे उद्योग-व्यवसायापासून अधिकारी-नागरिकांपर्यंत सर्वच संभ्रमात आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर नेमका काय बदल अपेक्षित आहे, जुलैनंतर व्यापार आणि ग्राहकांवर काय परिणाम होईल, याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी लोकमत कार्यालयात परिचर्चा घेण्यात आली. व्यापारी उद्योजक संघटनेचे पदाधिकारी संभ्रमात असले तरी चार्टड अकाउंटन्ट असलेल्या दोघांनी मात्र, देशातील ७५ टक्के वस्तू ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध होतील, असा दावा केला आहे. उत्पादन शुल्क - इम्पोर्ट ड्युटीसंदर्भात अद्याप जीएसटीच्याअधिकाऱ्यांच्यादेखील गाइडलाइन स्पष्ट नाही. जीएसटी परिषदेसोबत अधिकाऱ्यांचे गैरसमज आहेत. त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात कार्यशाळा सुरू आहेत. जीएसटीचे परिणाम दोन वर्षांनंतरच कळतील त्यावर आज भाष्य करणे घाईचे होईल.- विजय पनपालिया, अध्यक्ष, विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सचे इतर देशांशी तुलना करीत आपण जीएसटी लागू केली आहे; मात्र त्या देशांची मानसिकता, शिक्षण आणि संगणक साक्षरता विचारात घेतलेली नाही. एकीकडे आपणाकडे स्वच्छतेचे धडे द्यावे लागतात तर दुसरीकडे आॅनलाइन जीएसटीची नोंदणी करावी लागते. सामाजिक- सांस्कृतिक बाबींचा विचारही आधी केला पाहिजे.- विजय वाखारकर महानगर अध्यक्ष, अकोला सराफा असोसिएशनचे बहुतेक व्यापारी-उद्योजकांना सहामाही किंवा वार्षिक खाते नोंदणीची सवय आहे; मात्र जीएसटीमुळे दररोजच्या नोंदी, त्यादेखील आॅनलाइन करणे गरजेचे होणार आहे. व्यापाऱ्यांच्या तुलनेत जीएसटी ग्राहकांसाठी फायदेशीर असून, ७५ टक्के वस्तू किमान काही टक्क्यांनी तरी कमी झाल्याशिवाय राहणार नाही.- केवल डेढिया, चार्टड अकाउंटन्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागल्याने या व्यवसायाचे पुढे होते काय, याकडे आमचे लक्ष लागले आहे. यामुळे वाढलेली विदेशी गुंतवणूक कमी होईल. मुंबईत बुक केलेल्या वस्तू अनेकदा पंधरा दिवसांत मिळतात आणि जीएसटीचे फाइल त्या आधी करावे लागणार आहे. आपल्या देशात जीएसटीला अनुकूल असे वातावरण नाही.- हरीश लाखानी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे व्यावसायीक ‘जीएसटी’मुळे सर्वसामान्य ग्राहकाला स्वस्तात वस्तू मिळत आहे. याचा अर्थ व्यापारी-उद्योजकांवर कर अतिरिक्त लागेल, असे नाही. ‘वन नेशन वन टॅक्स’मुळे इतर करातून त्यांची मुक्तता होणार आहे. त्यामुळे अनेक ट्रेडर्सला २८ टक्के ‘जीएसटी’सदृश दिसत असला, तरी सेटअपमध्ये तो काही प्रमाणात अदृश्यदेखील होणार आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरू नये.- प्रेम गोयल, चार्टड अकाउंटन्ट कृषी संबंधित उत्पादनावर जीएसटी नसले, तरी धान्यावरील पुढच्या प्रक्रियेवर जीएसटी लागेल. जीएसटीमुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. संगणक साक्षरतेचे प्रमाण आपल्याकडे कमी असल्याने संगणक चालकांना जीएसटी नवीन संधी देत आहे. जीएसटीमुळे सरकारच्या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. करचोरीला लगाम बसेल.- प्रगणेश केनिया, दाल मिल उद्योजक