अकोला: लहान-लहान व्यापाऱ्यांना जीएसटी (वस्तू व सेवा कर) बाबत ज्या अडचणी येत आहेत, त्या समजून घेण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता महंमद अली चौकातील केएमटी हॉलमध्ये जीएसटीवर कार्यशाळा घेतली जात आहे. अकोला कच्छी मेमन जमातीच्या पुढाकरात होत असलेल्या या जीएसटी कार्यशाळेतून समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अकोला जीएसटी कार्यालयाचे उपायुक्त सुरेश शेंडगे, जीएसटी अधिकारी अभिजित नागले, जीएसटी निरीक्षक एस.एम. थोरात, सुदर्शन उघाडते येथे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. ज्या लघू व्यापारी आणि उद्योजकांना जीएसटीसंदर्भात समस्या किंवा अडचणी असतील त्यांनी येथे उपस्थित राहून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन एका पत्रकान्वये अकोला कच्छी मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया, सचिव सलीम गाजी, विदर्भ मेमन जमातीचे अध्यक्ष बिलाल ठेकिया यांनी केले आहे.
जीएसटीची कार्यशाळा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2017 1:21 AM