अकोला: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशनानंतर आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 202 तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे , प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
मागील तक्रारीचे सर्व विभागांनी 90 टक्के अनुपालन केल्यामुळे सर्व विभागाच्या अधिका-यांचे त्यांनी कौतुक केले. यापुढेही आपली सामाजिक बांधिलीकी समजुन नागरीकांच्या तक्रारींचे निरासरण करून त्यांना योग्य न्याय दयावा. अशा सुचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केल्यात. अर्ध न्यायीक प्रकरणाबाबत वरीष्ठ अधिका-यांकडे अपील करून न्याय मिळवावा किंवा पालकमंत्री यांच्या कडे प्रकरणाबाबत निवेदन दयावे असे त्यांनीही सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले. या तक्रार निवारण दिनाला उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार , अभयसिंग मोहिते, रमेश पवार, रामदास सिध्दभट्टी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अतुल तराणीया , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण वाघमारे, तहसिलदार गटविकास अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील
महसूल विभाग –58 तक्रारी, पोलीस विभाग—21, जिल्हा परिषद-- 43, मनपा-24, विद्युत विभाग –16, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-06, भूमी अभिलेख – 05, कृषी विभाग –04, जिल्हा अग्रणी बँक –03,एस.टी. महामंडळ-1, पाटबंधारे विभाग-05, पीकेव्ही-01, जिल्हा शल्य चिकित्सक-02, जिल्हा विपनण अधिकारी – 2,उपसंचालक आरोग्य सेवा-02- , पाटबंधारे विभाग- 03, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 01,वनविभाग-03, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी- 01, सार्वजनिक बांधकाम- 03, सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण-01, जिल्हा शल्य चिकित्सक- 02, जात पडताळणी समिती-02, जिल्हा अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क -02, अशा एकुण नविन 202 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.