अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला. पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याची माहिती पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन, पीक परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली. शेतावर जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याची माहिती घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्यासह तीनही तालुक्यांचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थिती व पाणीसाठ्यासंदर्भात घेतलेल्या माहितीचा गोषवारा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.‘या’ गावांमध्ये केली केली पाहणी!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने बोरगावमंजू, कुरणखेड, कोळंबी, अनभोरा, शेलू वेताळ, सोनोरी, घोटा, पिंजर, रेडवा इत्यादी गावांना भेटी देऊन पीक परिस्थिती व पाणीसाठ्याची माहिती पाहणी केली.शेतकरी-शेतजुरांशी केली चर्चा; अडचणी जाणून घेतल्या!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतावर जाऊन शेतकरी आणि शेतमजुरांसोबत चर्चा केली. पीक परिस्थिती, पाणीसाठा, तसेच वीजपुरवठ्यासंदर्भात शेतकºयांच्या अडचणी तसेच शेतमजुरांच्या अडचणीही पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या.
पावसातील खंड, आर्द्रतेचे प्रमाण कमी आणि पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याने, जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन, पीक परिस्थिती व पाणीसाठ्याची माहिती घेतली. घेतलेल्या माहितीचा गोषवारा मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री