जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात गुणवत्ताधारक खेळाडूंशी पालकमंत्री कडू यांनी हितगुज केले. गुणवत्ताधारक खेळाडूंच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे आदी उपस्थित होते. यावेळी खेळाडूंनी आपल्याला येत असलेल्या अडचणींची माहिती पालकमंत्र्यांना दिली. यामध्ये खेळांची साधने, आवश्यक आहार, वरिष्ठ पातळीवर खेळावयास जाण्यासाठी लागणारे आर्थिक साहाय्य इ.प्रकारच्या अडचणींची माहिती देण्यात आली. (फोटो)
-----------------
‘क्रीडापटूंनी अधिकृत संघटनांच्या माध्यमातून सहभागी व्हावे!’
खेळाडूंनी अधिकृत क्रीडा संघटनांच्यामार्फतच खेळाडूंनी स्पर्धात सहभाग घ्यावा, त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्कात रहावे,असे आवाहनही पालकमंत्र्यांनी खेळाडूंना केले. तसेच तालुका क्रीडा संकुलांचा वापर अधिकाअधिक प्रमाणात कसा करता येईल, यासाठी धोरण आखण्यात यावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.