- वसंत बाछुका, सचिव, ऑइल मिल असोसिएशन
यावर्षी महाराष्ट्रात लागवड क्षेत्र वाढले आहे. सध्या पिकांची स्थितीही चांगली आहे; परंतु केंद्र सरकारने सोयाबीन पेंडची आयात केली. त्यामुळे पेंडचे दर घसरले. आता तेलावरील आयात शुल्क कमी केले. मागील वर्षी २५ लाख टन पेंड आयात केली होती. तर यावर्षी १० लाख टनपर्यंत आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी होऊ शकतात. केंद्र सरकारने सोयाबीन पेंडची आयात बंद करून तेलावरील आयात शुल्क कमी करणे बंद केल्यास दर स्थिर राहू शकतात; परंतु सद्य:स्थितीत शासन याबाबत कुठलेही पाऊल उचलेल, असे वाटत नाही.
बॉक्स
कुक्कुटपालन व्यवसायात सोयाबीन पेंडचा मोठा वापर होतो. पण कुक्कुटपालन केंद्र मालक विदेशी पेंड मागवित आहे. त्यामुळे देशातील पेंड घेणार नाहीत व आयातमध्येही मागणी नाही. परिणामी, यावर आधारित उद्योग कमी प्रमाणात चालतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचे अपेक्षित भाव मिळणार नाही.