या सप्ताहनिमित्ताने बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु. येथे कृषी विज्ञान केंद्र अकोला तसेच कृषी विभाग बाळापूर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विद्यापीठाचे डॉ. चारुदत्त ठिपसे, कृषी सहायक बटवाडी बु. उद्धव धुमाळे, कृषी सहायक मनोज बोकसे वाडेगाव यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, फळबाग लागवड महत्त्व, योजना आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणार असल्याच सांगितले. या कार्यक्रमाला शेतकरी गजानन आखरे, श्रीरंग आखरे, कृषि मित्र जगदीश आखरे, स्वानंद मते, बाळू आखरे, मनोहर मते, दिनेश आखरे, रमेश आखरे, गोपाळराव आखरे, हिरामण आखरे उपस्थित होते.
फोटो: