खरीप हंगामातील विविध योजना, पीक लागवड, पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, फळबाग लागवड, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे व बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी, याविषयी कृषी सहायक शुभांगी गिर्हे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच समूह सहायक प्रतीक बढे व कृषिमित्र श्रीकांत डोईफोडे यांनी पोकराच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच यशोदा देवानंद सरदार, मंजू मुंडे, उषा सरदार, सोनू चोपडे, फयाजोद्दीन शेख, नीलेश पातोंड, राजू पिसाट, योगेश सोनोने, श्रीकांत देवळे, निखिल सरदार, गौतम सरदार, निखिल मुंगल, अमोल सरदार, सुधाकर सरदार, राहुल सरदार, शुद्धोधन सरदार व कृषी सहायक प्रतीक अवगन, समूह सहायक मुंगसाजी वाघमारे व गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
गोरेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:14 AM