सभेमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्धता व साठवणूक पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच गुलाबी बोंडअळी निर्मूलन करण्यासाठी अळीचे जीवनक्रम थांबविणे अत्यंत जरुरीचे असल्यामुळे त्याकरिता कपाशी पीक ३१ डिसेंबरपर्यंत काढण्याबाबत व काढलेल्या पिकाच्या अवशेषापासून कंपोष्ट खत बनविण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन एस.एस.राठोड यांनी केले, तसेच तूर पिकावरील शेंगा पोखरणारी अळी, हरभरा पिकाचे पाणी व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. शेतात कामगंध सापळे लावणे व पक्षी थांबे जास्तीत जास्त हेक्टरी १० ते १२ लावणे, कामगंध सापळे लावल्यामुळे आपल्या शेतात येणाऱ्या किडीची तीव्रता समजून येते. त्यानुसार फवारणी केव्हा व कोणत्या कीटकनाशकाची करावी, याचे वेळापत्रक ठरविता येते. मर रोगाचे व्यवस्थापन करण्याकरिता जैविक बुरशीनाशकाचा वापर व त्याचे जमिनीतील कार्य व वापरण्याच्या पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन एस.एस.राठोड कृषी सहायक बिडगाव यांनी केले. कार्यक्रमाकरिता ज्ञानेश्वर भिवरकर, धीरज काकड, सुभाष काकड, सारंगधर काळे, शरद भिवरकर, बाबाराव मोकाशे, अशोक काकड, बाळु भिवरकर, हरिदास भिवरकर, गजानन रेवस्कार, सुनील भिवरकर, मनोहर चक्रनारायण, गोविंद चांदणे, विजय काकड, गणेश काळे, सचिन काकड कृषिमित्र इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
फोटो