-------------
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
अकोला: जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा सातत्याने दिसून येतो. ज्यामुळे उत्पादनामध्ये बरीच घट होते. दरम्यान, किडीचा कसा नायनाट करता येईल याबाबत शिर्ला अंधारे येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत तथा विद्यार्थी जनजागृतीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. विद्यार्थी दीप पागृत यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत घुसर तालुका जिल्हा अकोला येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गोपाल बेद्रे, कार्यक्रम समन्वयक आणि कीटकशास्त्र विषयातील प्रा. उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शेतकरी संजयराव बेहरे, राम बेहरे, ओम ढोरे, नामदेव पागृत, आदी मंडळी उपस्थित होते.
-------------------------
भौरद येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्वा. इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषिदूत अभिजित नवल कव्हळे याने भौरद येथे गावात जाऊन शेतकऱ्यांना कमी खर्चात शेती कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सदाशिवराव चांदूरकर, प्रभाकर कवडे, ऋषीकेश चांदुरकर, धृपताबाई इंगळे, गयाबाई पाटमोचे, अर्चनाताई पडघन, आदी उपस्थित होते. यासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य वाय. आर. गवई, उपप्राचार्य एस. एस. धर्माळ, कार्यक्रम अधिकारी पी. एस. वानखडे, जे. आर. साळे यांचे मार्गदर्शन लाभले.