शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

राज्याच्या तिळाच्या बाजारपेठेवर गुजरातची संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:42 PM

अकोला: महाराष्ट्राच्या तिळाच्या बाजारपेठेत स्थानिक तीळ कमी आणि गुजरातचा तीळ जास्त दिसून येत असून, राज्यातील तीळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हक्काची स्थानिक बाजारपेठ गमाविली आहे.

- संजय खांडेकर

अकोला: महाराष्ट्राच्या तिळाच्या बाजारपेठेत स्थानिक तीळ कमी आणि गुजरातचा तीळ जास्त दिसून येत असून, राज्यातील तीळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हक्काची स्थानिक बाजारपेठ गमाविली आहे.महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ, मराठवाडा, आणि खान्देशच्या काही पट्ट्यातून कधीकाळी राज्यभरात तीळ पोहोचत असे. एवढे तीळ उत्पादक शेतकरी या पट्ट्यात होते. कालांतराने तिळाचा पेरा कमी झाला; मात्र तिळाची मागणी अजूनही आहे तशीच आहे. तेलाची मागणी कमी झाली असली तरी भाजी मसाला, तीळपट्टी आणि संक्रांतीसाठी अजूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तिळाची मागणी कायम आहे. पेºयाअभावी बाजारपेठेतील स्थानिक तीळ दिसेनासा होताच महाराष्ट्रातील तिळाची बाजारपेठ उत्तर प्रदेश आणि गुजरातने काबीज केली आहे. पांढरे आणि स्वच्छ आकर्षित पॅकिंगची तीळ गुजरातने बाजारात आणल्याने राज्यातील ग्राहकांनी स्थानिक तीळ नाकारणे सुरू केले. गुजरातच्या तिळास पसंती मिळू लागल्याने गुजरातचे एक नव्हे विविध कंपन्यांचे सहाही ब्रॅण्ड महाराष्ट्रात तेजीत आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक तीळ उत्पादक शेतकºयांना आता भाव नाही. महाराष्ट्रातील उपरोक्त परिसरातील तिळास १२० ते १४० प्रतीकिलो रुपये भाव मिळत आहे. त्या तुलनेत मात्र गुजरातच्या तिळास १६५ प्रतिकिलो भाव आहे. गुळगुळीत आकर्षक पॅकिंग आणि पांढरा शुभ्र तीळ असल्याने ग्राहक गुजरातचा तीळ निवडत आहे. त्या तुलनेत चविष्ट असलेल्या राज्यातील नैसर्गिक तिळास दुय्यम दर्जा मिळतो आहे. राज्याच्या तिळाच्या बाजारपेठेवर अप्रत्यक्षरीत्या गुजरातने संक्रात आणली आहे. राज्यातील तीळ उत्पादक शेतकºयांनी तीळमूल्य आणि बाजारपेठ दोन्ही गमाविल्याची जाणीव आता होत आहे. अकोल्यासारख्या ठिकाणी दहा कोटीची उलाढालप्रत्येक वर्षाच्या डिसेंबर ते जानेवारीपर्यंत, संक्रांतीच्या निमित्ताने तिळास विशेष मागणी असते. या दरम्यान दररोज एक ट्रक अकोल्याच्या ठोक बाजारपेठेत उतरतो. एका ट्रकची किंमत १६ लाख होते. त्या आकडेवारीनुसार अकोल्यात केवळ दोन महिन्यात दहा कोटीची उलाढाल होते. या व्यतिरिक्त वर्षभर तीळ आणि तीळ तेलाची मागणी वेगळी असते. 

स्थानिक तीळ उत्पादक शेतकºयांचा तीळ काळा-पांढरा मिक्स असतो. त्यामुळे त्याला कमी भाव मिळत आहे. अलीकडे प्रत्येक ग्राहकास पॅकिंग आणि स्वच्छ तीळ हवा असतो. त्यामुळे गुजरातचा तीळ अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात विक्री होत आहे.- सुशील पोतदार, ग्रेन मर्चंड, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजारGujaratगुजरात