गुरुमाउली संत वासुदेव महाराज यांच्या १०४ व्या जयंती महोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. गोपाल महाराज झामरे यांच्या हस्ते भागवत ध्वज पूजनाने भक्तिसोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेव महाराज महल्ले, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, विश्वस्त अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर, गजानन दुधाट, कानुसेठ राठी आदी उपस्थित होते.
संस्थेद्वारा कोविड संसर्ग नियंत्रणविषयक नियमाचे तंतोतंत पालन करीत जयंती महोत्सव संंपन्न होत आहे. सर्व नित्यनेमी कार्यक्रम, प्रवचन कीर्तनादी कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
दरम्यान, गुरुमाऊली जयंती महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम व श्री ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ झाला. संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त दादाराव पुंडेकर, पुष्पाताई पुंडेकर यांच्याहस्ते तीर्थस्थापना व गुरुपूजन पार पडले. यावेळी संस्थेचे सहसचिव अवि गावंडे, विश्वस्त अनिल कोरपे उपस्थित होते. पारायणपीठाचे नेतृत्व ह.भ.प. अंबादास महाराज मानकर करीत आहेत.
फोटो:
ज्ञानेश्वरी ज्ञानाचा अथांग सागर-गोपाल महाराज
कार्यक्रमात हभप डॉ. गोपाल महाराज यांनी ज्ञानेश्वरीचे श्रवण, मनन, चिंतन केल्यास मनुष्याचे विकार नष्ट होऊन हृदयी सात्त्विकता निर्माण होते. समाधिवस्था प्राप्त होते. म्हणूनच प्रत्येकाने ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी असे चिंतन मांडले. यासोबतच त्यांनी शास्त्र व्यावहारिक शास्त्र आहेत. त्यातून भौतिक सुख मिळते मात्र आपले दुःख दूर करू शकत नाही. ज्ञानदेवी समजणे कठीण असले तरी, व्यासंगातून ती अवगत झाल्यास खऱ्या सुखाची प्राप्ती होते, असे सांगत गोपाल महाराजांनी अनेक दृष्टांत सांगून ज्ञानेश्वरी भावकथेतील भाव प्रकट केला.